भारताच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळचा संघ 21 धावांत ऑलआऊट

भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-20 आशिया कप सामन्यात नेपाळ संघावर तब्बल 99 धावांनी विजय मिळवलाय. भारताच्या महिला गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करता नेपाळचा डाव 21 धावांवर संपुष्टात आणला.

Updated: Dec 2, 2016, 04:33 PM IST
भारताच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळचा संघ 21 धावांत ऑलआऊट title=

बँकॉक : भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-20 आशिया कप सामन्यात नेपाळ संघावर तब्बल 99 धावांनी विजय मिळवलाय. भारताच्या महिला गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करता नेपाळचा डाव 21 धावांवर संपुष्टात आणला.

याआधी भारताने गुरुवारी याच मैदानावर श्रीलंकेच्या संघाला 52 धावांनी हरवत फायनलमध्ये जागा पक्की केली होती. भारतीय महिला संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बाद 120 धावा केल्या. नेपाळसमोर विजयासाठी 121 धावांचे आव्हान ठेवले होते. 

मात्र भारतीय संघाच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळचा डाव 21 धावांवर आटोपला. नेपाळच्या एकही महिला फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. भारताकडून पूनम यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर शबिन्नानी मेघना हिने 2 विकेट घेतल्या.