सायना नेहवालला मकाऊ ओपनमध्ये पराभवाचा धक्का

भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालला मकाऊ ओपनमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सायनाला क्वार्टर फायनलच्या लढतीत चीनच्या झँग यिमानकडून 12-21,17-21 अशा सरळ दोन गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. 

Updated: Dec 2, 2016, 12:40 PM IST
सायना नेहवालला मकाऊ ओपनमध्ये पराभवाचा धक्का    title=

मकाऊ : भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालला मकाऊ ओपनमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सायनाला क्वार्टर फायनलच्या लढतीत चीनच्या झँग यिमानकडून 12-21,17-21 अशा सरळ दोन गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. 

पहिल्या गेममध्ये तर यिमानच्या खेळाचं सायनाचं काहीच चाललं नाही. दुस-या गेममध्ये सायनानं थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा पण तिचे प्रयत्न अपुरे पडले. दुखापतीतून कमबॅक करणा-या सायनाला गेल्या तिन्ही टुर्नामेंटमध्ये काहीच प्रभाव पाडता आला नाही.

चीन ओपन, हाँगकाँग ओपन आणि मकाऊ ओपनमध्ये सायनाला सपशेल अपयश आलं. आता सायनाला बॅडमिंटन कोर्टवर आपली जादू पुन्हा करण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागणार आहेत.