मोहाली : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची सुरुवात न्यूझीलंडच्या विरोधात पराभवाने झाली पण त्यानंतर टीम विजयाचा सिलसिला सुरु ठेवला आणि सेमीफायनलमध्ये धडक दिली.
ऑस्ट्रेलिया विरोधात विजय मिळवल्या बरोबरच टीम इंडियाने अनेक रेकॉर्ड्स देखील प्रस्थापित केले आहेत काय आहेत ते पाहा.
१. टी-20 वर्ल्डकपमध्ये टार्गेटचा पाठलाग करतांना विराट कोहलीचा रनरेट ४३४ आहे.
२. टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत ५१ बॉल्समध्ये ४५ रन्स केले आहेत.
३. आंतरराष्ट्रीय टी-20 वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद १५०० रन्स करण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे कोरला गेला आहे. विराटने ३९ इंनिगमध्ये हे रन्स ठोकले आहेत.
४. विराट कोहलीने टार्गेटचा पाठलाग करतांना १९ व्या इनिंगमध्ये १० वा अर्धशतक लगावलं आहे.
५. टार्गेटचा पाठलाग करतांना विराटने १९ इनिंगमध्ये ९०० रन्स केले आहेत. तर मॅक्युलमने १००६ रन्स केले आहेत.
६. विराट कोहलीने टार्गेटचा पाठलाग करतांना सर्वाधिक १० शतके लगावली आहेत.
७. भारताने ऑस्ट्रेलिया विरोधात ६ ओव्हरमध्ये ५९ रन्स दिले आहेत. जे टी-20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक स्कोर आहे. या आधी भारताने इंग्लंडला २००७ मध्ये ५७ रन्स दिले होते.
८. टी-20 क्रिकेटमध्ये ५० विकेट घेणारा अश्विन पहिला गोलंदाज ठरला आहे.
९. युवराज सिंगने आशिया कप आणि कालच्या मॅचमध्ये पहिल्या बॉलमध्ये विकेट घेतली आहे.
१०. टी-20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुम्राने एकूण १८ विकेट्स घेतले आहे आणि सगळ्या विकेट्स वेगवेगळ्या खेळाडूंच्या आहेत.
११. ऑस्ट्रेलिया विरोधातील मॅच आधी युवराजने कधीही नो किंवा व्हाईड बॉल टाकला नव्हता.
१२. टी-20 वर्ल्डकप २०१६ मध्ये भारताकडून विराट केहलीने सर्वाधिक ३० टक्के रन केले आहेत. असं करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.