आयपीएल ९ : धोनी जाणार कोणत्या संघात... पुणे की राजकोट

 चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल या निलंबित टीम्समधील प्लेअर्सना निवडण्याची पहिली संधी पुण्याच्या टीमला मिळाली आहे. 

Updated: Dec 10, 2015, 05:33 PM IST
आयपीएल ९ : धोनी जाणार कोणत्या संघात... पुणे की राजकोट title=

मुंबई :  चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल या निलंबित टीम्समधील प्लेअर्सना निवडण्याची पहिली संधी पुण्याच्या टीमला मिळाली आहे. 

धोनी, रहाणे, रैना हे स्टार प्लेअर्सचा कोणत्या टीममध्ये समावेश होतो याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलय. धोनीचा पुणे टीममध्ये समावेश होण्याची दाट शक्यता आहे. या प्लेअर्सची 15 डिसेंबरला पुणे आणि राजकोट टीम निवड करणार आहे. 

इंडियन प्रिमिअर लीगमध्ये आता दोन नव्या संघांना स्थान मिळाले आहे. पुणे आणि राजकोट हे दोन संघ पुढील दोन वर्षांसाठी जोडले जाणार आहे. आता क्रिकेट चाहते १५ डिसेंबरपर्यंत श्वास रोखून बसणार आहेत. या दिवशी दोन्ही संघ आपले खेळाडू निवडणार आहेत. 

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील टॉप १० प्लेअर घेण्यासाठी पुणे आणि राजकोट संघाची चढाओढ लागणार आहे. पाहू या भारतीय आणि परदेशी खेळाडूंची यादी. 

चेन्नई सुपरकिंग्ज - महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, ब्रँडन मॅकलम, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन

राजस्थान रॉयल्स - स्टीव्ह स्मिथ, शेन वॉटसन, अजिंक्य रहाणे, जेम्स फॉल्कनर, संजू सॅमसन 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.