स्टीव्ह स्मिथच्या विकेटचा दोषी 'चॅनल नाइन'?

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्किपर स्टीव्ह स्मिथची भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया T20 सामन्यातील विकेट तो बाद झाला तेव्हापासूनच चर्चेत राहिली आहे. 

Updated: Jan 27, 2016, 04:41 PM IST
स्टीव्ह स्मिथच्या विकेटचा दोषी 'चॅनल नाइन'? title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्किपर स्टीव्ह स्मिथची भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया T20 सामन्यातील विकेट तो बाद झाला तेव्हापासूनच चर्चेत राहिली आहे. आता या विकेटसाठी चॅनल नाईनच्या कॉमेंटेटर टीमला दोष दिला जात आहे. कारण खेळताना तो या टीमशी आपल्या माईकवरून बोलत होता.

स्मिथ जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा त्याने १५ चेंडूत २१ धावा केल्या होत्या. बोलण्याच्या नादात त्याने कोहलीच्या सरळ हातात झेल दिला. 

झेल घेतल्या घेतल्या कोहलीने त्याचेकडे पाहून काही हावभाव केले ज्यातून स्मिथचे कॉमेंटेटरशी बोलणे कोहलीला पसंत नसल्याचे स्पष्ट जाणवले. 
हा सामना शेवटी भारताने ६७ रन्सने जिंकला.

पाहा नेमकं काय झालं ...