नवी दिल्ली : सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस यांनी आपल्या जोडीदारांसोबत विजय मिळवून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत मिश्रित युगल सेमीफायनलमध्ये जागा मिळवलीय. त्यामुळे, मिक्स डबलमध्ये लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा हे दोन भारतीय खेळाडू आपापल्या जोडीदारासोबत एकमेकांनाच भिडणार आहेत.
क्वार्टर फायनल सामन्यात सानिया-सोरेन जोडीनं कॅसी डेलाक्वा आणि जॉन पीयर्स या ऑस्ट्रेलियन जोडीला सहज मात दिली. तर दुसरीकडे पेस आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिस जोडीनं आंद्रिया हलावाकोवा आणि अलेक्झेंडर पेया यांच्या जोडीला धूळ चारली.
सानियानं ब्राझीलचा आपला जोडीदार ब्रूनो सोरेनसोबत ग्रँड स्लॅम टूर्नामेंट ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमीफायनलमध्ये ही जोडी जर्मनीच्या ज्युलिया जार्जेस आणि चेक गणराज्यच्या कॅरोलिना प्लिसकोवा या जोडीशी भिडणार आहे.