इट्झकॅश आणि किंग्स XI पंजाब करणार अपस्मार आजाराविषयी जागृती

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधील किंग्स XI पंजाबने अपस्मार म्हणजेच फिट येणं, आकडी यासारख्या आजाराविषयी जागृती करण्यासाठी इट्झकॅश या भारतातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट्स फिनटेकसोबत करार केला आहे. या न्यूरॉलॉजिकल आजारासंबंधी पूर्वग्रह कमी करण्यासाठी आणि एकजूट निर्माण करण्यासाठी संघातील ग्लेन मॅक्सवेल, डी. सॅमी, अक्षर पटेल, मार्टिन गप्टिल, इशांत शर्मा आणि मनन व्होरा हे खेळाडू तसेच अधिकारी बुधवारी, 10 मे 2017 रोजी या कार्यासंदर्भात एकत्र आले होते.

Updated: May 13, 2017, 08:29 AM IST
इट्झकॅश आणि किंग्स XI पंजाब करणार अपस्मार आजाराविषयी जागृती title=

मुंबई : सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधील किंग्स XI पंजाबने अपस्मार म्हणजेच फिट येणं, आकडी यासारख्या आजाराविषयी जागृती करण्यासाठी इट्झकॅश या भारतातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट्स फिनटेकसोबत करार केला आहे. या न्यूरॉलॉजिकल आजारासंबंधी पूर्वग्रह कमी करण्यासाठी आणि एकजूट निर्माण करण्यासाठी संघातील ग्लेन मॅक्सवेल, डी. सॅमी, अक्षर पटेल, मार्टिन गप्टिल, इशांत शर्मा आणि मनन व्होरा हे खेळाडू तसेच अधिकारी बुधवारी, 10 मे 2017 रोजी या कार्यासंदर्भात एकत्र आले होते.

एपिलेप्सी फाउंडेशन इंडियासाठी निधी उभारण्यासाठी इट्झकॅशने आयोजित केलेल्या विशेष लिलावामध्ये टीम जर्सीज, बॅट, हेल्मेट आणि कॅप अशा स्वाक्षरी केलेल्या वस्तू ठेवल्या होत्या. लिलावादरम्यान, या वस्तूंबरोबरच, ग्लेन मॅक्सवेल आणि डॅरन सॅमी अशा खेळाडूंनी उपस्थितांचा उत्साह वाढवत स्वतःचे टी-शर्टही देऊ केले. यामुळे मोठ्या प्रमाणात निधी संकलित होण्यासाठी मदत झाली. पंतप्रधानांच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला अनुसरून, लिलावातून संकलित झालेला निधी इट्झकॅशच्या प्रीपेड कार्डमध्ये टाकण्यात आला आणि हे कार्ड इट्झकॅशचे अध्यक्ष अशोक गोएल आणि KXIP संघ यांनी संयुक्तपणे एपिलेप्सी फाउंडेशन इंडियाला दिले.

अशोक गोयल म्हणाले, “भारतात अमस्पामारावरील उपचारांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. कमी शिक्षण, दारिद्र्य, आरोग्यसेवेच्या निकृष्ट पायाभूत सुविधा व जागृतीचा अभाव यामुळे ही तफावत निर्माण झाली आहे आणि ती प्रभावीपणे कमी करणे आवश्यक आहे. आम्हाला किंग्स XI पंजाबसोबतचा आमचा सहयोग अतिशय जबाबदार पद्धतीने अंमलात आणायचा होता आणि त्यामुळे या आजारासंदर्भात काम करणे, तसेच त्यामुळे संबंधितांना कार्यासाठी प्रभावित करणे व जागृती निर्माण करणे यास इट्झकॅशमधील प्रत्येकाची पसंती होती.” 

या सहयोगाविषयी डॉ. सूर्या म्हणाले, “अपस्मार या आजारावर उपचार केले जाऊ शकतात, हा आजार नियंत्रित करता येऊ शकतो हे अनेकांना माहीत नाही. त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. समाजातही याविषयी अनेक प्रकारच्या गैरसमजुती असून त्या दूर करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा उपक्रमांमुळे या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी मदत होईल. हा प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातही अशा प्रकारचे आणखी उपक्रम आखायला हवेत.”

इट्झकॅशमधील वरिष्ठ व्यवस्थापनासोबतच, या उपक्रमाला पाठिंबा दर्शवण्यासाठी व एपिलेप्सी फाउंडेशनमधील व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या कॉर्पोरेटही उपस्थित होत्या.

इट्झकॅश कार्ड लि. या भारतातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट्स कंपनीची आणि एस्सेल समूहाचा भाग असलेल्या कंपनीची स्थापना 2006 मध्ये झाली. भारतात प्रीपेड पेमेंट्समध्ये प्रणेत्या असलेल्या इट्झकॅशने, कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने वाटचालीस सुरुवात करण्यासाठी भारतीय ग्राहकांसाठी आणि विविध व्यवसायांसाठी ‘डिजिटल कॅश’ ही संकल्पना आणली. इट्झकॅशने नावीन्यावर भर देणे कायम ठेवले असून, पेमेंट्स आणि निधी हस्तांतर सेवांच्या बाबतीत अनेक पर्याय देत उत्पादने दाखल केली आहेत. आतापर्यंत 110 दशलक्ष खाती जारी केली आहेत. इट्झकॅश सातत्याने तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक करते आणि उदयोन्मुख भारतासाठी जागतिक दर्जाचे, सर्वत्र उपलब्ध असणारे पेमेंट पर्याय निर्माण करते. इट्झकॅशचे सर्व ग्राहक श्रेणींमध्ये अस्तित्व असून दरवर्षी 35 दशलक्ष ग्राहकांना सेवा दिली जाते आणि 3000+ शहरांतील 75,000 फ्रेंचाइजींना “इट्झकॅशवर्ल्ड” असे ब्रँडिंग केले आहे. इट्झकॅशला मार्क्वी गुंतवणूकदार मॅट्रिक्स पार्टनर्स, लाइटस्पीड व्हेंचर आणि इंटेल कॅपिटल यांचे पाठबळ आहे.