नवी दिल्ली : डब्ल्यूडब्लयूईचा सुपरस्टार जॉन सिनानं रेसलमेनिया ३३दरम्यान त्याची गर्लफ्रेंड निकी बेलाला प्रपोज केलं आहे. मॅच संपल्यानंतर जॉन सिनानं रेसलमेनिया रिंगमध्येच निकीला प्रपोज केलं आणि हिऱ्याची अंगठी दिली.
रेसलमेनियाच्या मॅचवेळी मरीसनं निकी बेलाला टोमणा मारला होता. जॉन सिनानं निकाला अजूनही प्रपोज केलं नाही. माझ्या हातातली अंगठी बघून निकी बेला जळते, असं मरीस म्हणाला होता.
रविवारी रेसलमेनियामध्ये जॉन सिना आणि निकी बेलाच्या जोडीचा मुकाबला मिज आणि मरीस या जो़डीबरोबर होता. जॉन आणि निकीनं ही मॅच फक्त ५ मिनीटांमध्येच संपवली. पण ही मॅच संपल्यावर सगळ्या रिंगचाच माहोल रोमँटिक झाला. या मॅचला जॉन सिनाची आईही उपस्थित होती. प्रपोज केल्यानंतर जॉनच्या आईनं दोघांनाही मिठी मारली.
या मॅचनंतर जॉन सिना थोडे दिवस विश्रांती घेणार असल्यामुळे रेसलिंग रिंगमध्ये दिसणार नाही असं बोललं जात आहे. जॉन आणि निकीच्या लग्नाची तारीख अजूनही घोषित झालेली नाही.
TALK ABOUT A #WrestleMania MOMENT! @JohnCena and Nikki @BellaTwins are officially ENGAGED! pic.twitter.com/RaUMfN75lT
— WWE (@WWE) April 3, 2017
Power couples COLLIDE at The #UltimateThrillRide as @JohnCena & Nikki @BellaTwins take on @mikethemiz & @MaryseMizanin! #WrestleMania pic.twitter.com/RajihFxyzj
— WWE (@WWE) April 3, 2017
THEY'VE DONE IT! @JohnCena and Nikki @BellaTwins get the victory at the same time over @mikethemiz and @MaryseMizanin! #WrestleMania pic.twitter.com/iMxGHLjLCo
— WWE WrestleMania (@WrestleMania) April 3, 2017
EXCLUSIVE: @JohnCena and Nikki @BellaTwins share an emotional moment backstage after getting engaged. #WrestleMania pic.twitter.com/cWnN1shV0t
— WWE (@WWE) April 3, 2017