जायबंदी कोहलीने आरसीबीसाठी शेअर केला व्हिडीओ

खांद्याच्या दुखापतीने व्यस्त विराट कोहली आयपीएलचे पहिले दोन आठवडे खेळू शकणार नाही. मात्र त्याला काही शांत राहवत नाहीये. 

Intern Intern | Updated: Apr 3, 2017, 05:58 PM IST
जायबंदी कोहलीने आरसीबीसाठी शेअर केला व्हिडीओ title=

मुंबई : खांद्याच्या दुखापतीने व्यस्त विराट कोहली आयपीएलचे पहिले दोन आठवडे खेळू शकणार नाही. मात्र त्याला काही शांत राहवत नाहीये. 
 
त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यात तो त्याच्या टीमचा सपोर्ट कायम राहण्यासाठी आवाहन करतोय. 

ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यातून बाहेर येण्याचा तो प्रयत्न करतोय. त्यासाठी तो आराम करतोय. 

त्यात तो म्हणतोय, 'मी लवकरच येईन मात्र तोपर्यंत आपल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमला तुमच्या पाठींब्याची गरज आहे. तरच ते आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात जिंकू शकतील. संघांला तुमची साथ गरजेची आहे.'

खरंतर काही ना काही कारणाने प्रमुख भारतीय खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यात मुरली विजय, के.एल. राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा या खेळाडूंचा समावेश आहे.