जोश हेजलवूडचा विक्रमी चेंडू ठरला टेक्निकल ग्लिच

 ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज सामन्याच्या चौथ्या दिवशी एक खूपच इंटरेस्टींग गोष्ट घडली. १७९-३ असा ओव्हरनाईट स्कोअरवर डाव घोषीत करून चौथ्या दिवशी गोलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवूड याने आपल्या दुसऱ्या षटकात वेस्ट इंडिजच्या राजेंद्र चंद्रिका याला चेंडू टाकला. 

Updated: Dec 29, 2015, 09:07 PM IST
जोश हेजलवूडचा विक्रमी चेंडू ठरला टेक्निकल ग्लिच title=

मुंबई :  ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज सामन्याच्या चौथ्या दिवशी एक खूपच इंटरेस्टींग गोष्ट घडली. १७९-३ असा ओव्हरनाईट स्कोअरवर डाव घोषीत करून चौथ्या दिवशी गोलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवूड याने आपल्या दुसऱ्या षटकात वेस्ट इंडिजच्या राजेंद्र चंद्रिका याला चेंडू टाकला. 

हा चेंडू क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद चेंडू नोंदविण्यात आला. तो होता ताशी १६४.२ किलोमीटर (१०२ मिल). हा चेंडू शोएब अख्तरच्या १६१.३ किलोमीटर पेक्षा खूप जलद होता. 

 

हेजलवूड हा सरासरी १३५ किलोमीटर वेगाने चेंडू टाकतो. त्याचा चेंडू ताशी १६४.२ किलोमीटर आल्यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या.  त्याचे चाहत्यांना हा फार मोठा आश्चर्याचा धक्का होता. पण नंतर लक्षात आले की तो स्पीडोमीटरमधील टेक्निकल ग्लिच होता. त्यामुळे अशी चुकीची आकडेवारी दिसली.