'दिल्ली क्रिकेट संघटनेत निवडीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी' - केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, दिल्ली क्रिकेट संघटनेवर एक गंभीर आरोप केला आहे. डीडीसीएचे पदाधिकारी संघात निवड करण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करायचे, असा गंभीर आरोप केजरीवालांनी केला. 

Updated: Dec 29, 2015, 05:16 PM IST
'दिल्ली क्रिकेट संघटनेत निवडीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी' - केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, दिल्ली क्रिकेट संघटनेवर एक गंभीर आरोप केला आहे. डीडीसीएचे पदाधिकारी संघात निवड करण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करायचे, असा गंभीर आरोप केजरीवालांनी केला. 

Add Zee News as a Preferred Source

दिल्ली क्रिकेट संघामध्ये मुलाची निवड हवी असेल तर, एक रात्र सोबत करायला या, अशी डीडीसीएच्या पदाधिकाऱ्याने एका वरिष्ठ पत्रकाराच्या पत्नीला ऑफर दिली होती, असा दावा केजरीवालांनी केला आहे. 

आर्थिक भ्रष्टाचार नाही तर, डीडीसीएमध्ये सेक्स रॅकेटही चालते, असा आरोप केजरीवालांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भित्रे, मनोरुग्ण म्हटल्याचा आपल्याला अजिबात पश्चाताप नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

केजरीवालांनी आरोप केला असला तरी, त्याने त्याचे पुरावे दिलेले नाहीत. तो पत्रकार साक्ष द्यायला तयार आहे, असेही केजरीवालांनी सांगितले. 

About the Author