उत्तर कोरियाचा हुकूमशाहने पदक न जिंकणाऱ्यांना देणार कठोर शिक्षा

 उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकणाऱ्या खेळाडूंना विचित्र शिक्षा देण्याचा विचार केला आहे. 

Updated: Aug 25, 2016, 08:07 PM IST
उत्तर कोरियाचा हुकूमशाहने पदक न जिंकणाऱ्यांना देणार कठोर शिक्षा  title=

नवी दिल्ली :  उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकणाऱ्या खेळाडूंना विचित्र शिक्षा देण्याचा विचार केला आहे. 

या संदर्भात आलेल्या बातमीनुसार पदक जिंकले नाही म्हणून खेळाडूंना कोळशाच्या खाणीत काम करायला लावले जाऊ शकते. किम जोंगला आपल्या खेळाडूंकडून ५ सुवर्ण पदकसह १७ मेडलची अपेक्षा होती. उत्तर कोरियाला रिओ ऑलिम्पिकमध्ये केवळ ७ पदक मिळाले.  

उत्तर कोरियाकडून रिओ ऑलिम्पिकमध्ये ३१ खेळाडू पाठवले होते. त्यात दोन सुवर्ण, ३ रजत आणि २ कास्य पदक जिंकले. अशी पण बातमी आहे की एक फुटबॉल मॅच पराभूत झाल्यावर उत्तर कोरियाच्या खेळाडूंना लाइव्ह टीव्हीवर शिक्षा देण्यात आली. 

पदक जिंकणाऱ्यांना बक्षिस 

फायनानश्ल एक्स्प्रेस या वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार अपेक्षा प्रमाणे पदक न जिंकणाऱ्यांना शिक्षा देण्यात येणार तसेच त्याच्या सर्व सुखसुविधा हिसकावून घेतल्या जाणार आहेत. तसेच जिंकणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसं देण्यात येणार आहेत.