नवी दिल्ली : भारताच्या लिअँडर पेसनं मार्टिना हिंगिसच्या साथीनं अमेरिकन ओपनच्या मिक्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावलं. या सीझनमधील या दोघांचं हे तिसरं मेजर टायटल ठरलं. फायनलमध्ये पेस-मार्टिनानं अमेरिकेच्या सॅम क्युरी आणि बेथानी माटेक सँड्स जोडीचा 6-4, 3-6, 10-7 नं मात केली.
लिअँडर पेस आणि मार्टिना हिंगिसनं याआधी या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनला गवसणी घातली होती. तसेच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत स्विर्झलंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने भारताच्या सानिया मिर्झाने महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
आणखी घडामोडी
सेरेना विल्यम्सला परभवाचा धक्का
- अव्वल सीडेड अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला अमेरिकन ओपन टेनिसच्या सेमी फायनलमध्ये धक्कादायकरित्या पराभव सहन करावा लागला. सेरेनाला सेमी फायनलमध्ये 42 व्या मानांकित इटलीच्या पॉबर्चा विंचीकडून 2-6,6-4,6-4 नं पराभव सहन करावा लागला. टेनिसच्या इतिहासातील हा सगळ्याता मोठा अपसेट ठरलाय.
नोव्हाक जोकोविच फायनलमध्ये
- सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. सेमी फायनलमध्ये जोकोविचनं डिफेंडिंग चॅम्पियन मारियन चिलीचचा 6-0, 6-1, 6-2 नं धुव्वा उडवला. आता जोकोविचला या सीझनमधील आपलं तिसरं ग्रँडस्लॅम जिंकण्याची नामी संधी आहे. त्यानं विम्ब्ल्डन आणि फ्रेंच ओपनचा खिताब या सीझनमध्ये आपल्या नावावर केलाय.
रॉजर फेडररनही फायनलमध्ये
- दुस-या मानांकित रॉजर फेडररनही आपला अमेरिकन ओपनच्या फायनलचा प्रवेश निश्चि केला. त्यानं सेमी फायनलमध्ये आपल्याच देशआच्या स्टानिसलास वावरिंकावर 6-4, 6-3, 6-1 ने विजय मिळवला. 2009 नंतर फेडररनं पहिल्यांदाच अमेरिकन ओपनची फायनल गाठली आहे. आता फायनलमध्ये त्याचा मुकाबला सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचशी होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.