सापडला "मौका मौका...." मागचा मराठी माणूस

वर्ल्ड कप 2015 ची धुम सध्या जगभरात सुरू आहे, आणि भारतात त्याबरोबर चर्चा आहे ती "मौका मौका..." या जाहिरातीची. पण या जाहिरातीची संकल्पना नक्की कोणाची..? याचीही सर्वांना उत्कंठा आहे.

Updated: Mar 10, 2015, 06:58 PM IST
सापडला "मौका मौका...." मागचा मराठी माणूस title=

मुंबई : वर्ल्ड कप 2015 ची धुम सध्या जगभरात सुरू आहे, आणि भारतात त्याबरोबर चर्चा आहे ती "मौका मौका..." या जाहिरातीची. पण या जाहिरातीची संकल्पना नक्की कोणाची..? याचीही सर्वांना उत्कंठा आहे.

 
तर डोंबिवलीच्या एका मराठमोळ्या तरूणाची ही संकल्पना आहे. प्रथमेश साप्ते असे या तरूणाचे नाव आहे. "माझ्या जाहिरातीला दिलेली पसंती माझ्यासाठी आनंददायी आहे" असे मत प्रथमेशने व्यक्त केले आहे.
 

या जाहिरातीत स्टार स्पोर्ट्सच्या टीमच्या रोहीत खन्ना, जुजू बासू, मुस्तफा रंगवाले, विकास दुबे, अतुल्य प्राशर, अजित मेस्त्री यांचाही सिंहाचा वाटा आहे.
 

सर्वप्रथम ही जाहिरात भारत विरूद्ध पाकिस्तान  मॅचसाठी करण्यात आली होती. त्यानंतर मिळालेल्या पंसतीमुळे या जाहिरातीची मालिकाच तयार करण्यात आली आहे.