अव्वल स्थानासाठी कोलकाताचा मुंबईशी सामना

ऐतिहासिक ईडन गार्डनवर आयपीएल १०च्या हंगामातील अखेरचा लीग सामना रंगणार आहे. कोलकाता नाईटरायडर्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेत. मात्र आजचा हा सामना दोघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. 

Updated: May 13, 2017, 05:34 PM IST
अव्वल स्थानासाठी कोलकाताचा मुंबईशी सामना title=

कोलकाता : ऐतिहासिक ईडन गार्डनवर आयपीएल १०च्या हंगामातील अखेरचा लीग सामना रंगणार आहे. कोलकाता नाईटरायडर्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेत. मात्र आजचा हा सामना दोघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. 

अखेरच्या या सामन्यात जिंकणारा संघ अव्वल स्थानावर असणार आहे. मुंबई इंडियन्स पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थानी आहे त्यामुळे अव्वल स्थान टिकवण्यासाठी मुंबई प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे कोलकाताला अव्वल स्थान मिळवायचे असल्यास त्यांना हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे. 

आयपीएलच्या या हंगामातील मुंबईचा प्रवास पाहता या सामन्यात मुंबईचे पारडे जड वाटते. मात्र कोलकाताला कमी लेखून चालणार नाही. 

सामन्याची वेळ : ऱात्री ८ वाजता.