क्लार्कची भविष्यवाणी : हे दोन संघ असतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने चँपियंस ट्रॉफीबाबात भविष्यवाणी केली आहे. क्लार्कला वाटतं की, पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या चँपियंस ट्राफीच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ असतील.

Updated: May 14, 2017, 11:49 AM IST
क्लार्कची भविष्यवाणी : हे दोन संघ असतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने चँपियंस ट्रॉफीबाबात भविष्यवाणी केली आहे. क्लार्कला वाटतं की, पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या चँपियंस ट्राफीच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ असतील.

क्लार्कने म्हटलं आहे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचतील. इंग्लंडमध्ये संघ महत्त्वाची भूमिका निभावतील. जर गोलंदाजांना स्विंग आणि सीम मिळाली तर ऑस्ट्रेलियच्या गोलंदाजांचा सामना करणं कठिण असेल. मिशेल स्टार्क, जेम्स पॅटिनसन, जोश हेजलवुड, पॅट कमिंस यांना सामना करणं कठिण होऊन जाईल.

क्लार्कने हे देखील म्हटलं की, जर तेथे वातावरण गरम असेल तर तिथे काही टर्न मिळू शकतो. तर भारताच्या रवींद्र जडेजा आणि अश्विनचा सामना करणं कठिन असेल.