मुंबई अव्वल, कोलकात्यावर ९ धावांनी विजय

आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सने शनिवारी पॉईंट टेबलमधील आपले अव्वल स्थान कायम राखले. 

Updated: May 14, 2017, 12:10 AM IST
मुंबई अव्वल, कोलकात्यावर ९ धावांनी विजय title=

कोलकाता : आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सने शनिवारी पॉईंट टेबलमधील आपले अव्वल स्थान कायम राखले. 

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मुंबईने ९ धावांनी विजय मिळवला. १७४ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना कोलकात्याचा संपूर्ण डाव ८ बाद १६३ वर संपुष्टात आला. 

टीम साऊदी, विनय कुमार आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अव्वल स्थान मिळवण्याच्या दृष्टीने कोलकात्यासाठी या सामन्यात विजयाचे महत्त्व अधिक होते.

मात्र मुंबईने आपले स्थान कायम राखले. मुंबईकडून अंबाती रायडूने ६३ तर सौरभ तिवारी ५२ धावा केल्या.