वर्ल्ड कप २०१५ - मोहम्मद शमीने केला नाही सराव, केला आराम

भारताचा जलद गती गोलंदाज मोहम्मद शमी याने गेल्या आठवड्यात बांग्लादेश विरूद्ध क्वार्टर फायनल मॅचच्या थकव्यातून रिकव्हर झाला नाही. आज त्याने संपूर्ण आराम केला. 

Updated: Mar 23, 2015, 09:59 PM IST
वर्ल्ड कप २०१५ - मोहम्मद शमीने केला नाही सराव, केला आराम title=

सिडनी : भारताचा जलद गती गोलंदाज मोहम्मद शमी याने गेल्या आठवड्यात बांग्लादेश विरूद्ध क्वार्टर फायनल मॅचच्या थकव्यातून रिकव्हर झाला नाही. आज त्याने संपूर्ण आराम केला. 

शमी जेव्हा सराव करण्यास आला नाही. तेव्हा त्याच्या गुडघ्याच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. पण टीम मीडिया मॅनेजर आर. एन. बाबाने स्पष्ट केले की चिंता करण्याचे कारण नाही. शमी शंभर टक्के फिट आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध सेमी फायनलसाठी तो उपलब्ध असणार आहे. 

शमीने मोहित शर्मा आणि उमेश यादव प्रमाणे फुटबॉल का खेळला नाही. किंवा नेट्समध्ये गोलंदाजी का केली नाही. त्यावर त्यांनी सांगितले की, त्याला अतिरिक्त एक दिवसाचा आराम देण्यात आला आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने सात सामन्यात १७ विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने आज नेट्समध्ये बऱाच काळ गोलंदाजी केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.