मुंबई इंडियन्सने टी-२० मध्ये केला ऐतिहासिक रेकॉर्ड

मुंबईने प्ले ऑफसाठी क्वालीफाय केलं तर आहेच पण कोलकात्याचा पराभव करत नवा रेकॉर्ड देखील बनवला आहे. या सामन्यात शानदार विजयासह मुंबई टीमने एक असा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे जो टी20 इतिहासात अजून कोणीच केला नाही.

Updated: May 14, 2017, 02:58 PM IST
मुंबई इंडियन्सने टी-२० मध्ये केला ऐतिहासिक रेकॉर्ड title=

मुंबई : मुंबईने प्ले ऑफसाठी क्वालीफाय केलं तर आहेच पण कोलकात्याचा पराभव करत नवा रेकॉर्ड देखील बनवला आहे. या सामन्यात शानदार विजयासह मुंबई टीमने एक असा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे जो टी20 इतिहासात अजून कोणीच केला नाही.

कोलकात्यावर विजय मिळवत टी20 क्रिकेटच्या इतिहासात मुंबई १०० सामने जिंकणारी पहिली टीम बनली आहे. मुंबईची टीम या सीजनमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. मुंबईने 14 पैकी १० सामन्यांमध्ये विजय मिळवत २० गुण मिळवले आहे.

मुंबईच्या 174 रन्सचा पाठलाग करतांना केकेआर टीमने आठ विकेट गमवत 164 रन केले. कोलकात्याचा कोणताही फलंदाज मोठी खेळी नाही करु शकला.