ढाका : 'रात गई बात गई' ही हिंदी म्हण आपण ऐकली असले पण बांगलादेशचा क्रिकेटर रुबेल हुसेन यांच्याबाबत 'मॅच गई बात गई' अशी स्थिती झाली आहे. इंग्लडला वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखविणारा रुबेल हुसेन यांच्यावरचे बलात्काराचे आरोप मागे घेणारी अभिनेत्री नाझनीन हीने यू-टर्न घेत पुन्हा बलात्काराची केस दाखल केली आहे.
रुबेलने क्वार्टर फायनलमध्ये भारताविरूद्ध चांगली कामगिरी करावी, त्यामुळे नाझनीन अख्तर हीने त्याच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेतले होते. पण आता या प्रकरणी तीने यू-टर्न घेतला आहे.
एका हिंदी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, नाझनीन म्हणाली, होय, मी ही केस पुढे चालविणार आहे. तिने स्पष्ट केले की, मी रुबेल हुसेनला इतक्या सहजासहजी जगू देणार नाही. फसवणुकीला शिक्षा झालीच पाहिजे.
गेल्या जानेवारी महिन्यात रुबेल हुसेन याने तीन दिवसांसाठी कारागृहाची हवा खाल्ली होती. पण वर्ल्ड कपच्या टीममध्ये त्याचा समावेश झाल्याने त्याला जामीनावर सोडण्यात आले होते. वर्ल्ड कपमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला क्वार्टर फायनलपर्यंत पोहचविले होते. त्यानंतर नाझनीनने रुबेल विरूद्धची केस मागे घेतली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.