ब्राझिल : फुटबॉल खेळाडू नेमारच्या अंडरवियरची चौकशी होणार आहे, ही बाबतीत ब्राझीलमध्ये प्रचंड अफवा पसरली.
याबाबतीत असं म्हटलं जातंय की, एका खास ब्रॅण्डची अंडरवियर दाखवून नेमारने विश्व चषक सामन्यात फिफाच्या मार्केटिंग नियमांचं उल्लंघन केलं तर नाही, याची ती चौकशी आहे.
नेमारच्या बाबतीत असं म्हटलं जातंय की, नेमारने ज्या ब्रॅण्डची अंडरवियर दाखवली, त्या टीमची अंडरवियर कंपनी अधिकृत स्पॉन्सर नाहीय.
विश्व चषकाच्या नियमानुसार कोणताही खेळाडू धार्मिक, राजकीय संदेश देऊ शकत नाही, किंवा प्रचारही करू शकत नाही.
फिफाची नियमावली आणि दस्तऐवज फक्त फुटबॉल खेळाडू आणि फुटबॉल संघांकडे आहे, यामुळे नेमारने खरोखर फुटबॉलचे नियम तोडले आहेत का?, हे सांगणे सध्या कठीण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.