विम्बल्डन सुपर संडे: फेडरर आणि जोकविचमध्ये सुपर मुकाबला

विम्बल्डनमध्ये टेनिस चाहत्यांना रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकविचमध्ये सुपर संडेचा सुपर मुकाबला पहायला मिळणार आहे. २०१४ विम्बल्डनप्रमाणेच यावेळेसही जोकोविच आणि फेडररमध्ये विम्ब्लडन फायनलचं घमासान होणार आहे. 

AFP | Updated: Jul 12, 2015, 10:01 AM IST
विम्बल्डन सुपर संडे: फेडरर आणि जोकविचमध्ये सुपर मुकाबला title=

लंडन: विम्बल्डनमध्ये टेनिस चाहत्यांना रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकविचमध्ये सुपर संडेचा सुपर मुकाबला पहायला मिळणार आहे. २०१४ विम्बल्डनप्रमाणेच यावेळेसही जोकोविच आणि फेडररमध्ये विम्ब्लडन फायनलचं घमासान होणार आहे. 

गेल्यावर्षी जोकोविचनं बाजी मारली होती. त्यामुळं या पराभवाची सव्याज परतफेड करण्यास फेडरर आतूर असेल. त्याचप्रमाणे फेडररला आपल्या टेनिस करिअरमधील अठरावं ग्रँडस्लॅम जिंकण्याचीही संधी आहे. 

आता अव्वल सीडेड जोकोविच बाजी मारतो की, फेडरर आपला २०१२ पासूनचा ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा दुष्काळ संपवतो याकडे टेनिसप्रेमींचं लक्ष असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.