बांगलादेश वि. न्यूझीलंड - काही बनले शानदार रेकॉर्ड

 वर्ल्ड कपच्या ग्रुप एच्या आज सेडन पार्कमध्ये खेळण्यात आलेल्या न्यूझीलंड-बांगलादेशला ३ विकेटने पराभूत केले. वर्ल्ड कपमधील किवी संघाचा हा सलग सहावा विजय आहे. 

Updated: Mar 13, 2015, 09:00 PM IST
बांगलादेश वि. न्यूझीलंड - काही बनले शानदार रेकॉर्ड title=

मुंबई :  वर्ल्ड कपच्या ग्रुप एच्या आज सेडन पार्कमध्ये खेळण्यात आलेल्या न्यूझीलंड-बांगलादेशला ३ विकेटने पराभूत केले. वर्ल्ड कपमधील किवी संघाचा हा सलग सहावा विजय आहे. 

या विजयासाठी न्यूझीलंडला आपल्याच मैदानावर खूप घाम गाळावा लागला. बांगलादेशने फलंदाजी करत ५० षटकात महमदुल्लाहच्या शतकीय खेळीने न्यूझीलंडसमोर २८९ धावांचे लक्ष्य ठेवले, पण या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड पराभूत होता होता जिंकला. न्यूझीलंडने तीन विकेट आणि सात चेंडू राखून निसटता विजय मिळविला 

पाहा आजच्या सामन्यातील काही शानदार रेकॉर्ड 

- बांगलादेशच्या महमुदुल्लाने वर्ल्डमध्ये आपले लागोपाठ दुसरे शतक केले. असे करणारा तो पहिला बांगलादेशी प्लेअर बनला आहे. यापूर्वी इंग्लंडविरूद्ध त्याने पहिले शतक केले होते. 

- बांगलादेशच्या महमुदुल्लाह या मॅचमध्ये लागोपाठ दुसरे शतक बनविल्यानंतर तो बांगलादेशचा दुसरा फलंदाज बनला आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये लगोपाठ दुसरे शतक लगावले आहे. यापूर्वी शहरियार नफीस याने २००६मध्ये झिम्बाब्वे विरूद्ध लागोपाठ दोन शतक लगावले होते. 

- बांगलादेशने २८८ धावा केल्या तो या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरूद्ध सर्वाधिक धावसंख्या ठरली. यापूर्वी कोणत्याही संघाने २०० पेक्षा अधिक धावा केलेल्या नाहीत.

- न्यूझीलंडविरूध्द प्रथम फलंदाजी करताना अत्यंत स्लो सुरूवात झाली. पहिल्या पाच ओव्हर्समध्ये केवळ ४ धावा बनल्या. २००२ नंतर ही सर्वात स्लो सुरवात होती. यापूर्वी २००६मध्ये झिम्बाब्वेने पाच ओव्हर्समध्ये ३ रन्स बनविले होते. 

- न्यूझीलंडच्या रॉस टेलरने सर्वात जलद ५००० धावा पूर्ण करणारा पहिला किवी फलंदाज बनला आहे. ५००० धावा करणारा तो पाचवा न्यूझीलंडचा फलंदाज आहे. टेलरने बांगलादेशविरूद्ध ३७ वी धाव काढल्यानंतर त्याने हा टप्पा गाठला. 

- टेलरने या सामन्यात ५६ धावांची खेळी केली. यासाठी त्याने ९७ चेंडूंचा सामना केला. वर्ल्ड कपमधील सर्वात स्लो खेळीमध्ये त्याचा क्रमांक तिसरा लागतो. 

- न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने या मॅचमध्ये १० ओव्हर्समध्ये ३ मेडनसह ५६ धावा देत २ विकेट घेतल्या. त्यामुळे तो या वर्ल्ड कपमध्ये १५ विकेटसह पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.