रिओ : शुक्रवारी झालेल्या अतिशय रोमांचित अशा बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. अगदी थोडक्यात तिचं सुवर्ण पदक हुकलं पण फायनल संपल्यानंतर ही भारताच्या सिंधूने एक सुवर्ण कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारतीय बॅटमिंटन खेळाडूने अंतिम सामना गाठला.
सामना जिंकल्यानंतर रॅकेट कोर्टवरच टाकत तिने तिचा विजय साजरा केला. कॅरोलिनाला आनंदाश्रृ अनावर झाले. त्यानंतर सिंधूने खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवलं. ती स्वत: कॅरोलिनाला जाऊन भेटली आणि तिने देखील सिंधूला मिठी मारली. अगदी शांत खेळ करणाऱ्या कॅरोलिनालाही सिंधूने शेवटपर्यंत दिलेल्या झुंजला सलाम केला असेल. सिंधूने तिचं रॅकेट उचलून योग्य जागेवर ठेवलं.
सिंधूने अशी खेळाडूवृत्ती दाखवत सर्वांचेच मन जिंकली आणि हारूनही जिंकली. एक चांगला खेळाडू कसा असतो याचं उदाहरण तिने ठेवलं. भल्याभल्यांचा पराभव करत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच संधी मिळालेल्या २१ वर्षीय सिंधू भविष्यात नक्कीच गोल्ड मेडल जिंकेल.