आयसीसी रँकिंगमध्ये अश्विन दुसऱ्या स्थानावर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुरु असलेल्या मालिकेत कमालीचे प्रदर्शन करणाऱा भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विनने कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी क्रमवारीत सर्वोत्कृष्ट स्थानी झेप घेतलीये. तिसऱ्या कसोटी सामन्यात एकूण १२ बळी घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. यामुळे अश्विनच्या क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा होत तो दुसऱ्या स्थानी पोहोचलाय. 

Updated: Nov 30, 2015, 04:12 PM IST
आयसीसी रँकिंगमध्ये अश्विन दुसऱ्या स्थानावर title=

दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुरु असलेल्या मालिकेत कमालीचे प्रदर्शन करणाऱा भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विनने कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी क्रमवारीत सर्वोत्कृष्ट स्थानी झेप घेतलीये. तिसऱ्या कसोटी सामन्यात एकूण १२ बळी घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. यामुळे अश्विनच्या क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा होत तो दुसऱ्या स्थानी पोहोचलाय. 

आयसीसीने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार अश्विन गोलंदाजांच्या क्रमवारीत ८५६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन ८८४ गुणांसह अव्वल आहे. तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा जेम्स अँडरसन आहे. अव्वल दहामध्ये अश्विन व्यतिरिक्त एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. 

दरम्यान, फलंदाजांच्या क्रमवारीत आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डेविलियर्सच्या क्रमवारीत मात्र घसरण झालीय. फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा ज्यो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ ८८६ गुणांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानी आहेत. तर डेविलियर्सची तिसऱ्या स्थानी घसरण झालीये. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.