भारताचा स्टार क्रिकेटपटू आर. अश्विनचा नेत्रदानाचा निर्णय

आपल्या फिरकी गोलंदाजीच्या तालावर जगभरातील फलंदाजांना नाचवणाऱा भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विनने आदर्श उदाहरण आपल्यासमोर ठेवलेय. अश्विनने आपले डोळे दान कऱण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Jan 9, 2017, 01:23 PM IST
भारताचा स्टार क्रिकेटपटू आर. अश्विनचा नेत्रदानाचा निर्णय title=

चेन्नई : आपल्या फिरकी गोलंदाजीच्या तालावर जगभरातील फलंदाजांना नाचवणाऱा भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विनने आदर्श उदाहरण आपल्यासमोर ठेवलेय. अश्विनने आपले डोळे दान कऱण्याचा निर्णय घेतलाय.

अश्विनने याबाबतची सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांना ही बातमी दिलीये. अश्विनने रोटरी राजन आय बँकला आपले डोळे दान केलेत. 

अश्विनने द हिंदु वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याचे काम करण्याचा माझ्या पत्नीचा प्रयत्न होता. आज मी डोळे दान करुन याची सुरुवात केलीये. मला आशा आहे की यात लोक मला साथ देतील. 

क्रिकेटच्या मैदानावर अश्विनची गेल्यावर्षातील कामगिरी जबरदस्त राहिलीये. अश्विनने केवळ गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही कमाल दाखवली.