अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदालचा धक्कादायक पराभव

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सगळ्यात धक्कादायक निकाल लागला आहे. दोन वेळचा चॅम्पियन राफेल नदालचं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आले आहे.

Updated: Sep 6, 2016, 09:02 AM IST
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदालचा धक्कादायक पराभव title=

वॉशिंग्टन : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सगळ्यात धक्कादायक निकाल लागला आहे. दोन वेळचा चॅम्पियन राफेल नदालचं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आले आहे.

फ्रान्सच्या लुकास पाऊलीने नदालला पराभवाचा दे धक्का दिला. 6-1, 2-6, 6-4, 3-6, 7-6 अशा सेट्समध्ये पाऊलीने नदालला धूळ चारली. या विजयामुळं पाऊलीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

22 वर्षीय पाउलीसाठी त्याच्या करियरमधील हा सगळ्यात मोठा विजय आहे. दुसरीकडे 30 वर्षीय स्पेनचा नदाल 2004 नंतर पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारु शकलेला नाही.