...आणि रोहित शर्माची पत्नी नाराज झाली

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंटवर विजय मिळवत जेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी ऋतिका हिनेही हजेरी लावली होती. 

Updated: May 22, 2017, 06:51 PM IST
...आणि रोहित शर्माची पत्नी नाराज झाली title=

बंगळूरु : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंटवर विजय मिळवत जेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी ऋतिका हिनेही हजेरी लावली होती. 

रोहित आणि मुंबईला सपोर्ट करण्यासाठी तिने हजेरी लावली होती. रोहितच्या प्रत्येक शॉटवर ती त्याला प्रोत्साहन देत होती. 

एक वेळ होती जेव्हा रोहितच्या शॉटमुळे ऋतिकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र पुढच्याच क्षणात तिचा चेहरा पडला. ऋतिकाच्या चेहऱ्यावरील ही नाराजी कॅमेऱ्यात दिसत होती. 

रोहित शर्मा बाद होताच ऋतिका हिरमुसली. त्याने २२ चेंडूत २४ धावा केल्या. सामन्यातील १०.१ षटकांत तो बाद झाला. रोहित खेळपट्टीवर सेट होत असतानाच झम्पाने त्याची विकेट काढली.