सानियाला करोडोंचा मदतनिधी मिळाल्यानंतर 'फुलराणी'ची व्यथा उघड

देशाची ‘फूल’राणी - बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ही सध्या व्यथीत झालीय. गुरुवारी तीनं तिची ही व्यथा सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे सगळ्यांसमोर उघड केलीय. 

Updated: Jul 25, 2014, 04:05 PM IST
सानियाला करोडोंचा मदतनिधी मिळाल्यानंतर 'फुलराणी'ची व्यथा उघड title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : देशाची ‘फूल’राणी - बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ही सध्या व्यथीत झालीय. गुरुवारी तीनं तिची ही व्यथा सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे सगळ्यांसमोर उघड केलीय. 

आंध्रप्रदेश राज्य सरकारनं जाहीर केलेली 50 लाख रुपयांचा पुरस्कार अजूनही आपल्या हाती न पडल्यानं आपण ‘दुखी’ झाल्याचं सायनानं म्हटलंय. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर सायनाला 50 लाख रुपयांचा पुरस्कार राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला होता. 

सायना सध्या जखमी असल्याकारणानं गुरुवारपासून ग्लासगोमध्ये सुरु झालेल्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होऊ शकलेली नाहीए. सायनानं तेलंगणा सरकारद्वारे टेनिसपटू सानिया मिर्झा हिला राज्याच्या ब्रॅंड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती केलीय. यावर, सायनानं सानियाला शुभेच्छाही दिल्यात. 

पण, सानिया मिर्झा हिच्या प्रशिक्षणासाठी तेलंगणा सरकारनं एक करोड रुपयांच्या सहाय्यता निधी देण्याची घोषणा केल्यानंतर सायनानं आपली ही नाराजी उघड केलीय, हेही महत्त्वाचं आहे.

‘हे जाणून खूप आनंद झाला की सानिया मिर्झा हिला तेलंगणाची ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मला तेलंगणाचा अभिमान आहे. पण, लंडन ऑलिम्पिकमध्ये देशासाठी कांस्य पदक जिंकल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या पुरस्काराची रक्कम मला अजुनही न मिळाल्यानं मला खूप दुख होतंय’, असं सायनानं ट्विटरवर म्हटलंय. 

सायनाला हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती तेव्हा आंध्रपदेशचं विभाजन झालेलं नव्हतं. तसंच तत्कालीन मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी यांनी व्यक्तीगतरित्या सायनाला शुभेच्छा देत या पुरस्काराची घोषणा केली होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.