नवी दिल्ली : फुलराणी सायना नेहवाल ब्रँडच्या दुनियेची सम्राज्ञी झाली आहे. तिनं आयओएस स्पोर्ट्स अँड एन्टरटेन्मट कंपनीबरोबर दोन वर्षांसाठी २५ कोटींचा करार केलाय. वर्ल्ड नंबर वन झाल्यानंतर सायनाची ब्रँड व्हॅल्यूही वाढली आहे.
आयओएस कंपनी क्रिकेटर सुरेश रैना, बॉक्सर मेरी कोम, रेसलर सुशील कुमार आणि बॉक्सर विजेंदर सिंगचं काम हाताळते. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल पटकावल्यानंतर सायना अव्वल स्थानावर विराजमान झाली.
याआधी २ एप्रिल २०१५ मध्ये सायना नंबर वन झाली होती. मात्र, त्यावेळी तिला फारकाळ आपलं अव्वल स्थान कायम राखता आलं नव्हतं. मात्र आता सायानाला बराच काळ आपलं नंबर वन स्थान अबाधित राखता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.