नवी दिल्ली: भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आज वर्ल्ड रॅंकिंगमध्ये पुन्हा अव्वल स्थानी पोहोचलीय. चीनची ली शुरूई तिसऱ्या स्थानी घसरल्यानंतर सायना पुन्हा पहिल्या नंबरवर पोहोचली.
या महिन्याच्या सुरूवातीला इंडियन ओपन सुपर सीरिज जिंकण्यासोबतच सायना वर्ल्ड रॅँकिंगमध्ये पहिल्या स्थानी पोहोचणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू बनली होती. मात्र काहीच दिवसात मलेशिया ओपन सुपर सीरिजच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर ती दुसऱ्या स्थानावर पोहोचली. सायना मागील आठवड्यात झालेल्या सिंगापूर ओपन सुपर सीरिजमध्ये खेळू शकली नाही. मात्र चीनच्या खेळाडूनं नाव परत घेतल्यानंतर आणि दुसऱ्या स्थानाचं नुकसान झाल्यानंतर सायनाला आता पुन्हा फायदा झाला. स्पेनची मारिन कॅरोलिना आता दुसऱ्या स्थानावर आहे.
यादरम्यान पी व्ही सिंधू पहिल्या 10 खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडून वर्ल्ड रॅँकिंगमध्ये 12व्या स्थानावर पोहोचलीय. ती आधी नवव्या स्थानी होती. पुरुषांच्या रँकिंगमध्ये के. श्रीकांतनं चौथ्या स्थानावर कायम आहे. तर पी. कश्यप सिंगापूर ओपनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचल्यामुळं एक स्थान वर म्हणजे 14व्या स्थानावर पोहोचलाय. तर सिंगापूरला क्वॉर्टर फायनलमध्ये पराभूत झाल्यानं बाहेर झालेला एच. एस. प्रणय एक स्थान खाली घसरत 15व्या स्थानावर पोहोचला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.