टीम इंडियाचे साक्षी धोनीने केले समर्थन

वर्ल्डकप २०१५ मधील सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडियावर चहूबाजूने टीकेची झोड उठत आहे. क्रिकेट चाहत्यांकडून राग व्यक्त करण्यात आला. असे असताना कर्णधार महेंद्रसिंग याची पत्नी साक्षी धोनीने टीम इंडियाचे समर्थन केलेय.

Updated: Mar 27, 2015, 12:04 PM IST
टीम इंडियाचे साक्षी धोनीने केले समर्थन  title=

रांची : वर्ल्डकप २०१५ मधील सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडियावर चहूबाजूने टीकेची झोड उठत आहे. क्रिकेट चाहत्यांकडून राग व्यक्त करण्यात आला. असे असताना कर्णधार महेंद्रसिंग याची पत्नी साक्षी धोनीने टीम इंडियाचे समर्थन केलेय.

या पराभवाबद्दल चाहते नाराज असून अनेक ठिकाणी खेळाडूंची पोस्टर्स जाळून निषेध व्यक्त केला. तर विराट कोहलीची मैत्रिण अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यावर जोरदार जोक्स आणि कमेंट्स व्यक्त होत आहे. व्हाट्सअॅपवर अनुष्काची जोरदार खिल्ली उडविली आहे. तर विराटवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

देशात संतापाची लाट उठली असताना महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने हिने टीम इंडियाला पाठिंबा दर्शवला आहे. आपल्याला टीमचा अभिमान वाटतो, असे म्हटले आहे.  जय-पराजय हा खेळाचाच एक भाग आहे. सामन्यात भारतीय संघाने कडवी लढत दिली. मला त्यांचा अभिमान वाटतो, असे साक्षी म्हणाली. 

टीमने आत्तापर्यंत केलेल्या सर्व त्यागाचे चीज झाले, असे ट्विट करत साक्षीने समर्थनच केले आहे. कालच्या पराभवानंतर टीम इंडियावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. दरम्यान, साक्षीने गेल्या महिन्यात एका गोड मुलीला जन्म दिला असून 'जिबा' असे तिचे नाव ठेवण्यात आले आहे. मात्र विश्वचषक स्पर्धेत व्यस्त असल्याने महिन्याभरानंतरही महेंद्रसिंग धोनीला अद्याप आपल्या मुलीला भेटता आलेले नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.