सिडनी : भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगीस यांनी दिमाखदार कामगिरीचा नजराणा पेश करताना यंदाच्या वर्षातील महिला दुहेरीत पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकलेय.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सानिया-मार्टिना जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत चेक रिपब्लिकच्या अँड्रिया लॅव्हाकोवा आणि ल्युसी रॅडेकाला ७-६, ६-३ असे अवघ्या दोन सेटमध्ये पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदावर कब्जा केला. या जोडीचा हा सलग ३६वा विजय आहे. गेल्यावर्षापासून अपराजित राहण्याच विक्रम त्यांनी कायम ठेवलाय.
सानियाचे कारकिर्दीतील हे सहावे ग्रँडस्लॅम आहे. या जोडीने गेल्या वर्षी विम्बल्डन तसेच अमेरिकन ओपनचे जेतेपद मिळवले होते. त्यांचे हे सलग तिसरे ग्रँडस्लॅम आहे.