सानियाला 'खेलरत्न' पुरस्कार देण्यावर हायकोर्टाची स्थगिती

टेनिसस्टार सानिया मिर्झा हिला देशाचा सर्वोच्च पुरस्कार असलेला 'राजीव गांधी खेळरत्न' पुरस्कार देण्यावर कर्नाटक हायकोर्टानं तात्पुरती स्थगिती दिलीय.

Updated: Aug 27, 2015, 04:20 PM IST
सानियाला 'खेलरत्न' पुरस्कार देण्यावर हायकोर्टाची स्थगिती  title=

मुंबई : टेनिसस्टार सानिया मिर्झा हिला देशाचा सर्वोच्च पुरस्कार असलेला 'राजीव गांधी खेळरत्न' पुरस्कार देण्यावर कर्नाटक हायकोर्टानं तात्पुरती स्थगिती दिलीय.

गेल्या वर्षी पुरस्कार निवड समितीने या पुरस्कारासाठी कुणालाही योग्य मानलं नव्हत. त्यामुळे तो कुणालाही देण्यात आला नव्हता. यंदा अखेरच्या क्षणी विश्व दुहेरी टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सानियाच्या नावाची शिफारस करण्यात आली. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानंदेखील तिच्या नावावर मोहोर उमटवली.

अधिक वाचा - सानियाचं शोएबच्या जीवनातील स्थान काय? पाहा, शोएबच्याच शब्दांत

पण, सरकारच्या निर्णयाविरुद्ध पॅरा-ऑलिम्पिक एन. ग्रिशानं आव्हान दिलंय. तिच्या म्हणण्यानुसार, या पुरस्कारासाठी ती स्वत: योग्य खेळाडू आहे. ग्रिशा हिचे वकील श्याम सुंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टानं सानिया मिर्झा आणि केंद्र सरकारला नोटीस धाडून दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिलेत.

त्यामुळे, या दरम्यान सानियाला पुरस्कार दिला गेला तरी अवॉर्ड दिल्यानंतरही कोर्टाचा निर्णय अंतिम राहील... आणि त्यानंतर सानियाला हा पुरस्कार परत करावा लागेल. 

एन. ग्रिशाने २०१२ च्या पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुष वर्गात उंच उडी (हाय जम्प) घेऊन सिल्व्हर मेडल पटकावलं होतं... या स्थानावर पोहचणारा ग्रिशा पहिला भारतीय आहे. 

सानियाला राष्ट्रीय क्रीडादिनी २९ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे. आता याबद्दल केंद्र सरकारला निर्णय घ्यायचाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.