मुंबई : खेळाडूंसह पत्नी आणि गर्लफ्रेंडला प्रवास करण्याची परवानगीवर गरमागरम चर्चा सुरू असताना पाकिस्तानचा माजी स्पिनर सकलेन मुश्ताकने खुलासा केला की १९९९ वर्ल्ड कपमध्ये त्याने आपल्या पत्नीला हॉटेलच्या खोलीतील कपाटात लपविले होते.
सकलेनने सांगितले की , १९९९ च्या वर्ल्ड कपमध्ये आम्ही पत्नी आणि कुटुंबियांसोबत प्रवास करीत होतो आणि स्पर्धेत मजा येत होती. सेमी फायनल पूर्वी आमच्या मॅनेजमेंटने सांगितले की तुम्हांला पत्नींसह राहण्यास परवानगी नाही. मी सनाला (पत्नी) सांगितले, तू घरी नाही जाणार इथेच राहणार... त्याने सांगितले की, ती हॉटेलच्या एका खोलीत राहत होती. मॅनेजर किंवा कोच आल्यावर तिला कपाटात लपण्यास सांगत होता.
त्याने एक मजेदार किस्साही यावेळी सांगितला. एकदा अझहर मेहमूद आणि मोहम्मद युसूफ एकेदिवशी खोलीत आले. जोर जोरात हसायला लागले. त्यांनी सांगितले त्यांना माहीत आहे की त्याच्या खोलीत त्याची पत्नी आहे आता ती कपाटातून बाहेर येऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.