जे सचिनला नाही जमलं ते विराटने करुन दाखवलं - गांगुली

विराट कोहलीने टेस्टमध्ये सलग चार मालिकांमध्ये द्विशतक ठोकली. ऑस्ट्रेलियातही विराटने शतकं झळकाविली आहेत. जे सचिन तेंडुलकरला नाही जमलं ते विराट कोहलीने करून दाखवलं असं भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने म्हटले आहे.

Updated: Mar 2, 2017, 04:56 PM IST
जे सचिनला नाही जमलं ते विराटने करुन दाखवलं - गांगुली title=

मुंबई : विराट कोहलीने टेस्टमध्ये सलग चार मालिकांमध्ये द्विशतक ठोकली. ऑस्ट्रेलियातही विराटने शतकं झळकाविली आहेत. जे सचिन तेंडुलकरला नाही जमलं ते विराट कोहलीने करून दाखवलं असं भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. पहिल्या सामन्यात भारताचा मोठा पराभव झाला त्यामुळे विराटवर टीका होऊ लागली आहे. विराटला या सामन्यामध्ये मोठी खेळी करता नाही आली. टीका होत असतांनाच गांगुलीने त्याच्या पाठिशी उभा राहिला आहे. गांगुलीने कोहलीचं कौतुक केलं आहे.

पुण्यातील टेस्टमध्ये दोन्ही डावात कोहली अपयशी ठरला. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विराटच्या फक्त त्या मॅचकडे बघु नका. असं देखील गांगुलीने म्हटलं आहे.