आफ्रिदीचा कर्णधारपदाचा राजीनामा पण...

पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शाहीद आफ्रिदीनं टी 20 च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे.

Updated: Apr 3, 2016, 05:02 PM IST
आफ्रिदीचा कर्णधारपदाचा राजीनामा पण... title=

मुंबई: पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शाहीद आफ्रिदीनं टी 20 च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडाळावा लागला. यानंतर शाहीद आफ्रिदीवर जोरदार टीका झाली. यानंतर आफ्रिदीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. 

असं असलं तरी मी देशासाठी खेळत राहणार असल्याचं स्पष्टीकरण आफ्रिदीनं दिलं आहे. टी 20 वर्ल्ड कपवेळी आपण निवृत्त होणार असल्याचे संकेत आफ्रिदीनं दिले होते. पण आता मात्र आफ्रिदीनं यूटर्न घेतला आहे.