शांघाय : शांघाय मास्टर्स टेनिस ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रॉजर फेडररने चीनच्या नोव्हाक जोकोविकला सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. स्वित्झर्लंडच्या फेडररने जोकोविकची हटट्रीक रोखत शांघाय मास्टर्स ओपन आपल्या नावावर करण्यापासून रोखले.
फेडरर हा सतरा वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन जिंकून अग्रस्थानी आहे. त्याने जोकोविकला ६-४, ६-४ अशा सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरीत पोहोचला आहे.
गेल्याच आठवड्यात पाचव्यांदा चीन ओपन जिकण्याचा विक्रम नोंदविणारा जोकोविक हा स्वतःच्या मायभूमीत २९वी मॅच जिंकण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरला होता. मात्र, फेडररने त्याचे हे स्वप्न धुळीस मिळविले.
फेडररने एटीपी रॅकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राफेल नदालला मागे टाकून दुसऱ्या क्रमांक पटकावला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.