पगारासाठी लिटिल मास्टरचं सुप्रीम कोर्टाला पत्र

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष सुनील गावसकर यांनी आपल्याला आपल्या कामाचा मोबदला, आपला पगार मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितलीय. 

Updated: Jul 11, 2014, 03:24 PM IST
पगारासाठी लिटिल मास्टरचं सुप्रीम कोर्टाला पत्र title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष सुनील गावसकर यांनी आपल्याला आपल्या कामाचा मोबदला, आपला पगार मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितलीय. 

गावसकर यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून बोर्डाकडून आपल्या वेतनाचं देण्यात यावं, अशी मागणी केलीय. मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लिटिल मास्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या गावसकर यांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय सरळ सरळ सर्वोच्च न्यायालयालाच पत्र धाडलंय.  

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात एन. श्रीनिवासन यांचं नाव समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना बीसीसीआय अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 28 मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं गावसकर यांची संकटाच्या वेळी बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते.

आपला 65 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गावसकर यांनी सर्वोच्च न्यायालयाला हे पत्र पाठवलंय. गावसकर यांच्या निरीक्षणाखाली इंडियन प्रीमिअर लीग आयपीएलचं सातवं सत्र दुबई आणि भारतात आयोजित करण्यात आलं होतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.