सुरेश रैनाने केली नवग्रह मंदिरात पूजा

नुकताच विवाह बंधनात अडकलेला क्रिकेटर सुरेश रैना याने तामिळनाडूच्या नागपत्तनम जिल्ह्यातील नवग्रह मंदिरात पूजा केली. तीन एप्रिलला प्रियंकाशी लग्नाच्या बेडीत अडकलेल्या रैनाने तिरूवेंकादू, कीझापेरूमपाल्लम आणि तिरूंबरम गावातील नवग्रह मंदिरांमध्ये जाऊन पूजा केली. मंदिराची प्रदक्षिणा करणाऱ्या रैनाने कपाळावर चंदनाचा टीळा आणि पवित्र भस्म लावला होता. 

Updated: Apr 14, 2015, 07:07 PM IST
 सुरेश रैनाने केली नवग्रह मंदिरात पूजा title=

नागपत्तनम : नुकताच विवाह बंधनात अडकलेला क्रिकेटर सुरेश रैना याने तामिळनाडूच्या नागपत्तनम जिल्ह्यातील नवग्रह मंदिरात पूजा केली. तीन एप्रिलला प्रियंकाशी लग्नाच्या बेडीत अडकलेल्या रैनाने तिरूवेंकादू, कीझापेरूमपाल्लम आणि तिरूंबरम गावातील नवग्रह मंदिरांमध्ये जाऊन पूजा केली. मंदिराची प्रदक्षिणा करणाऱ्या रैनाने कपाळावर चंदनाचा टीळा आणि पवित्र भस्म लावला होता. 

चेन्नई सुपरकिंग्जच्या या स्टार क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या मंदिरात आल्याने काही ग्रहांच्या वक्रदृष्टीपासून बचाव होतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.