महिलेने उचलले गोल्डन बॉय सुशील कुमारला, फोटो झाला व्हायरल

२० व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुन्हा एकदा सुशील कुमारच्या नेतृत्वाखाली कुस्तीपटूंनी शानदार प्रदर्शन करत पाच गोल्ड मेडल भारताच्या पारड्यात टाकले आहे. सुमारे आठ वर्षांपासून एकानंतर एक पदक आपल्या नावावर करणाऱ्या सुशील कुमार ग्लासगोमध्ये सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्यामुळेच गोल्ड मेडल जिंकल्यावर एका कॅनेडियन महिला खेळाडूने त्याला आपल्या हातांनी उचलून घेतले आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

Updated: Aug 1, 2014, 06:21 PM IST

ग्लासगो : २० व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुन्हा एकदा सुशील कुमारच्या नेतृत्वाखाली कुस्तीपटूंनी शानदार प्रदर्शन करत पाच गोल्ड मेडल भारताच्या पारड्यात टाकले आहे. सुमारे आठ वर्षांपासून एकानंतर एक पदक आपल्या नावावर करणाऱ्या सुशील कुमार ग्लासगोमध्ये सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्यामुळेच गोल्ड मेडल जिंकल्यावर एका कॅनेडियन महिला खेळाडूने त्याला आपल्या हातांनी उचलून घेतले आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

Photo: :-) :-)

सुशील कुमारने स्वतः शेअर केला फोटो
ऑलिम्पिकसह अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावर तिरंगा फडकविणाऱ्या सुशील कुमारने कॅनडाच्या खेळाडूशी सुरू असलेली मजामस्तीचा फोटो स्वतःच्या फेसबुकच्या ऑफिशअल पेजवर शेअर केली. या फोटोला कालपासून २ लाख ५ हजार १७० लाइक्स मिळाले असून ४ हजार ७१७ जणांनी हा फोटो शेअर केला आहे. 
तसेच ट्विटरवर हा फोटो चाहत्यांकडून शेअर केला जात आहे. 

कॅनडाच्या या महिला कुस्तीपटूचे नाव आहे इरिका वीब असून ती महिलांच्या 75 किलो वजनी गटात कुस्ती खेळते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.