धोनीच्या यशाचं हे आहे रहस्य

क्रिकेट जगतात भारतीय संघाचा दबदबा निर्माण करणाऱ्या भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या यशाचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर हा फोटो पाहून तुम्हाला नक्कीच कळेल. 

Updated: Mar 7, 2016, 03:19 PM IST
धोनीच्या यशाचं हे आहे रहस्य title=

नवी दिल्ली : क्रिकेट जगतात भारतीय संघाचा दबदबा निर्माण करणाऱ्या भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या यशाचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर हा फोटो पाहून तुम्हाला नक्कीच कळेल. 

धोनी कधीच विजयाचे श्रेय स्वत: घेत नाही. सामना संपल्यानंतर जेव्हा ट्रॉफी घेताना सर्व क्रिकेटर्स फोटो घेत असतात तेव्हा धोनी नेहमी बाजूला उभा असतो. तो कधीच इतर क्रिकेपटूंच्यामध्ये नसतो. यावरुन स्पष्ट होते की धोनीला नेहमी आपल्या क्रिकेटर्सनी आनंदित रहावे असे वाटते आणि तो सारे श्रेय त्यांना देतो. 

याआधी २००७च्या वर्ल्डकपमध्येही तसेच २०११मध्ये झालेल्या वर्ल्डकपदरम्यान धोनी फोटोमध्ये बाजूल अथवा पाठीमागे दिसला होता. यामुळेच की काय धोनीला कॅप्टन कूलही म्हटले जाते. रविवारीही बांगलादेशला हरवल्यानंतर सर्व क्रिकेटटू विजयाच्या जल्लोषात होते. मात्र या जल्लोषात धोनी मागेच होता. आपल्या सहकाऱ्यांचा आनंद पाहून तो खुश होता.