'विराटशी तुलना करायची एकाही पाक खेळाडूची लायकी नाही'

पाकिस्तान क्रिकेट जगतात उमर अकमलला सर्वात उत्कृष्ठ बॅटसमन म्हणून ओळखलं जात असलं तरी माजी हरफनमौला मुदस्सर नजर यांच्या म्हणण्यानुसार, अकमलच काय पाकिस्तानच्या कोणत्याही बॅटसमनची भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीशी तुलना करण्याची लायकी नाही.

Updated: Feb 27, 2015, 05:53 PM IST
'विराटशी तुलना करायची एकाही पाक खेळाडूची लायकी नाही'  title=

पर्थ : पाकिस्तान क्रिकेट जगतात उमर अकमलला सर्वात उत्कृष्ठ बॅटसमन म्हणून ओळखलं जात असलं तरी माजी हरफनमौला मुदस्सर नजर यांच्या म्हणण्यानुसार, अकमलच काय पाकिस्तानच्या कोणत्याही बॅटसमनची भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीशी तुलना करण्याची लायकी नाही.

'विराट आणि अकमलमध्ये खूप फरक आहे. अकमल आणि अहमद शहजाद दोघांनीही कुआलालम्पूरमध्ये अंडर १९ वर्ल्डकप खेळलं होतं ज्यामध्ये विराटनं भारताची कॅप्टन्सी सांभाळली होती. त्यावेळीही, विराट वेगळ्यचा दर्जाचा खेळाडू होता' अशी आठवणही नजर यांनी सांगितलीय. 

'ते भले प्रतिभावान खेळाडू असतील पण विराटच्या दर्जाचे बॅटसमन नाहीत. दोघांमध्ये जमीन-आसमानचा फरक आहे' असं ते म्हणतायत. संयुक्त अरब आमिरात टीमचे बॅटसमन सल्लागार असलेल्या नजर यांनी यावेळी विराटचं तोंड भरून कौतुक केलंय. 

नजर यांच्या म्हणण्यानुसार, विराट, एबी डिविलियर्स आणि डेविड वॉर्नर यावेळी विश्व क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ बॅटसमन आहेत.

पाकिस्तानबद्दल बोलताना, पाकिस्तान सलग चांगलं खेळू शकलेलं नाही, त्यामागे अनेक कारणं आहेत. भारताच्या तुलनेत पाकिस्तानची बेन्च स्ट्रेंथ काहीच नाही. भारतचा रणजी ट्रॉफीचा सापळा नेहमीच मजबूत राहिलाय. भारताच्या आर्थिक ताकदीमुळे त्यांना अत्याधुनिक अॅकॅडमींना चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी भरपूर मदत मिळालीय... पण, पाकिस्तान क्रिकेटचे मात्र सोन्याचे दिवस मागे पडलेत आणि ते पाकिस्तानला पुन्हा लवकर पाहायला मिळतील अशीही शक्यता कमीच...'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.