आफ्रीदीने तोंड बंद ठेवावे अन्यथा...- दाऊद

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदीला धमकी दिलीये. तोंड बंद ठेव अन्यथा परिणाम भोगायला तयार अशा शब्दात दाऊदने आफ्रिदीली धमकावल्याची माहिती आहे.

Updated: Oct 15, 2016, 12:02 PM IST
आफ्रीदीने तोंड बंद ठेवावे अन्यथा...- दाऊद title=

इस्लामाबाद : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदीला धमकी दिलीये. तोंड बंद ठेव अन्यथा परिणाम भोगायला तयार अशा शब्दात दाऊदने आफ्रिदीली धमकावल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी शाहीद आफ्रिदी आणि जावेद मियाँदाद यांच्यात मॅचफिक्सिंगवरुन आरोप-प्रत्यारोप झाले. आफ्रीदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे फेअरवेल मॅच खेळवण्यासाठी अपील केले होते. त्यावेळी आफ्रीदी केवळ पैशाच्या लोभापायी अशी मागणी करत असल्याची टीका मियाँदाद यांनी केली. 

यानंतर या टीकेला आफ्रीदीनेही चांगलेच प्रत्युत्तर दिलेत. आफ्रीदीने मियाँदाद यांना त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचीही धमकी दिली. 

12 ऑक्टोबर रोजी 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान दाऊदने स्वत: आफ्रिदीला फोन केला आणि म्हटले की त्याने तोंड बंद ठेवावे अथवा त्याचे परिणाम भोगायला तयार रहावे.