द्रविडकडून सचिनची नक्कल

राहुल द्रविडची ओळख म्हणजे शांत आणि सभ्य कोणाच्याही वाटेला न जाणारा खेळाडू.

Updated: Mar 3, 2016, 04:30 PM IST
द्रविडकडून सचिनची नक्कल title=

मुंबई: राहुल द्रविडची ओळख म्हणजे शांत आणि सभ्य कोणाच्याही वाटेला न जाणारा खेळाडू. पण निवृत्त झाल्यानंतर मात्र द्रविड आपली ही ओळख पुसायचा प्रयत्न करत आहे.

एका कार्यक्रमामध्ये बोलताना राहुल द्रविडनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची नक्कल केली आहे. वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोनमध्ये झालेल्या मॅचवेळची सचिनबाबतची आठवण राहुल द्रविडनं सांगितली.

साऊथ झोनविरुद्धच्या मॅचमध्ये वेस्ट झोनकडे चांगला स्पिनर नव्हता, याबाबत संजय मांजरेकर आणि रवी शास्त्री बोलत होते. या दोघांचं बोलणं सचिन तेंडुलकरनं ऐकलं, आणि 'मै डालेगा' अशी प्रतिक्रिया दिली. 

त्यावर मांजरेकर आणि रवी शास्त्री यांनी क्या डालेगा असं सचिनला विचारलं. तेव्हा कुछ भी डालेगा, ऑफ स्पिन भी या लेग स्पिन भी, असं सचिन म्हणाला.  

सचिनची ही आठवण राहुल द्रविडनं जागी केली, आणि त्याची हुबेहुब नक्कल केली. 

पाहा द्रविडचा व्हिडिओ