सुशील कुमारची रिओवारी धोक्यात

दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा कुस्तीपटू सुशील कुमारच्या रिओ ऑलिम्पिकमधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.  

Updated: May 12, 2016, 01:37 PM IST
सुशील कुमारची रिओवारी धोक्यात title=

नवी दिल्ली : दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा कुस्तीपटू सुशील कुमारच्या रिओ ऑलिम्पिकमधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.  

भारतीय कुस्तीगीर संघटनेनं जारी केलेल्या ऑलिम्पिकच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत सुशील कुमारचं नाव वगळण्यात आलंय. प्रत्येक वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांची यादी पाठवण्याची परंपराच असल्याचं भारतीय कुस्तीगीर संघटनेनं म्हटलंय. 

गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारचा वजनी गट बदलल्यानं त्याला यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या नरसिंग यादवच्या गटामधून खेळण्याचा सुशील कुमारचा प्रयत्न होता. पण आता नरसिंग यादवचंच नाव पुढे गेल्यानं सुशीलच्या रिओमधील सहभागावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 

पण कुस्तीगीर संघटनेच्या यादीत नाव नसल्यानं सुशीलकुमार रिओला जाऊच शकत नाही असा अर्थ काढणं चुकीचा असल्याचं इंडियन ऑलिम्पक असोशिएशन म्हटलं.