कुस्तीपटू योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिक सुवर्णपदक शक्य !

भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तला ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तनं कांस्य पदक पटकावलं होतं. 

PTI | Updated: Sep 3, 2016, 12:59 PM IST
कुस्तीपटू योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिक सुवर्णपदक शक्य ! title=

नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तला ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तनं कांस्य पदक पटकावलं होतं. 

60 किलो फ्री स्टाईल वजनी गटात त्यानं हे यश मिळवलं होतं. मात्र चार वेळा वर्ल्ड चॅम्पिअन आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा बेसिक कुडुखोव्ह वाडाने घेतलेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळे योगेश्वरला रौप्य पदक बहाल करण्यात आले.

मात्र आता सुवर्णपदक मिळवणारा खेळाडूही उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला. त्यामुळे योगेश्वरचं ब्राँझ आता थेट सुवर्णपदकात रुपांतरीत होऊ शकतं. 2014 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्यानं सुवर्णपदक मिळवलं होतं. भारत सरकारने योगेश्वरला 2013 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं होते.