युवीनं शोएब मलिकच्या चॅलेंजला दिलं दमदार उत्तर

भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहनं पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि टेनिस स्टार सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकचं चॅलेंज स्वीकारत जबरदस्त उत्तर दिलंय. शोएबनं काही दिवसांपूर्वी युवीला ट्विटरवरून एक चॅलेंज दिलं होतं. पण हे चॅलेंज क्रिकेटबद्दल नाही तर डांसबद्दल आहे. 

Updated: Jul 27, 2015, 03:55 PM IST
युवीनं शोएब मलिकच्या चॅलेंजला दिलं दमदार उत्तर title=

मुंबई: भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहनं पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि टेनिस स्टार सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकचं चॅलेंज स्वीकारत जबरदस्त उत्तर दिलंय. शोएबनं काही दिवसांपूर्वी युवीला ट्विटरवरून एक चॅलेंज दिलं होतं. पण हे चॅलेंज क्रिकेटबद्दल नाही तर डांसबद्दल आहे. 

शोएब मलिकच्या मैदानात येण्याच्या चॅलेंजला उत्तर देत युवीनं ट्विटरवर 10 सेकंदांचा व्हिडिओ टाकलाय. शोएबला टॅग करत युवीनं लिहिलंय 'भाई हम तो हमेशा मैदान में थे'...

पाकिस्तानच्या श्रीलंकेवरील विजयानंतर सानिया मिर्झा आणि शोएबनं डांस केला होता. युवराज सानिया आणि शोएबच्या डबस्मॅश व्हिडिओनं प्रभावित झाला नव्हता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता आणि नेटकऱ्यांनी चांगलाच पसंत केला होता. युवराज सिंहनं शोएब आणि सानिया मिर्झाची गम्मत करत त्यांना भयंकर डांसर्स म्हटलं होतं.

युवराजनं सानिया आणि शोएबच्या व्हिडिओबाबत ट्विट केलं होतं. त्यात दोघं खूप चांगले खेळाडू पण भयानक डांसर्स म्हटलं होतं. तेव्हा शोएबनं ट्विटर करून युवराजला आ जाओ मैदान में, हे चॅलेंज दिलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.