आयफोन ५ एस सेक्युरिटी सिस्टिम हॅक!

आयफोन ५ एसच्या मालकांची चिंता वाढणारी ही बातमी आहे. आयफोन – ५ एस अनलॉक करण्यासाठी फोनच्या मालकाची परवानगी नसली तरीही हा फोन अनलॉक करणं काही अवघड नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे आयफोन ५ एसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.

Updated: Sep 26, 2013, 05:13 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, बर्लिन
आयफोन ५ एसच्या मालकांची चिंता वाढणारी ही बातमी आहे. आयफोन – ५ एस अनलॉक करण्यासाठी फोनच्या मालकाची परवानगी नसली तरीही हा फोन अनलॉक करणं काही अवघड नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे आयफोन ५ एसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.
आयफोन ५ एस अनलॉक करण्यासाठी फोनमालकाने जरी स्वतःच्या फिंगर प्रिंट सेट करून ठेवलेल्या असतील तरी आयफोन ५ एस अनलॉक करता येऊ शकतो. हा दावा केला आहे, जर्मनीच्या हॅकर्सने! अपलची नवी बायोमॅट्रिक प्रणाली भेदण्यात या हॅकर्संना यश आले आहे. ही प्रणाली फारशी सुरक्षित नसल्याचे हॅकर्सनी म्हटलं आहे.
चाओस कॉम्प्युटर क्लब (सीसीसी) असं या हॅकर्सच्या टोळीच नाव आहे. अपलची सुरक्षा प्रणाली भेदणं फारसं अवघड नसल्याचं त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर म्हटलं आहे.
सीसीसीच्या प्रवक्त्याने याबद्दल सांगितंल, आयफोन ५ एस अनलॉक करण्यासाठी फोनमालकाच्या कोणत्याही काचेवरच्या फिंगर प्रिंटस घेतल्या आणि त्याचे फोटो काढल्यास त्याचा वापर फोन अनलॉक करण्यासाठी केला जाऊ शकतो.’, तसेच हा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वसाधारण पासवर्डचाच वापर करावा असंही या प्रवक्त्यानं म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.