`ब्लॅकबेरी क्यू-१०` भारतात लॉन्च...

ब्लॅकबेरीनं आपला नवीन स्मार्टफोन ब्लॅकबेरी ‘क्यू-१०’ भारतात लॉन्च केलाय. या फोनची किंमत भारतात ४४,९९० रुपये जाहीर करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 6, 2013, 04:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
ब्लॅकबेरीनं आपला नवीन स्मार्टफोन ब्लॅकबेरी ‘क्यू-१०’ भारतात लॉन्च केलाय. या फोनची किंमत भारतात ४४,९९० रुपये जाहीर करण्यात आलीय. या फोनसाठी तुम्ही काही दिवस saholic.com वरही ऑनलाईन बुकींग करू शकता.
भारतात लॉन्चिंगपूर्वी या फोनची ऑनलाईन रिटेलरकडून ४४,९९९ एव्हढी किंमत निर्धारित करण्यात आली होती. ब्लॅकबेरीनं फेब्रुवारी महिन्यात ‘झेड-१०’ हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. याची किंमत ४३,४९० रुपये इतकी हहोती.
एक नजर टाकुयात ब्लॅकबेरी ‘क्यू-१०’च्या काही फिचर्सवर
- 3.1इंचाचं एमोलेड टचस्क्रीन
- फिजिकल क्युरी किबोर्ड
- ८ मेगापिक्सल कॅमेरा
- २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- वाय-फाय आणि ब्लू टूथ
- फोर जी आणि एनएफसी
- २ जीबी रॅम
- १६ जीबीचं इंटरनल स्टोरेज
- २१०० mAH बॅटरी

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.